राहता वीजवितरण कार्यालय समोर मनसेच्या वतीने आंदोलन

0 20

अहमदनगर –  सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार वीजवितरण मनसे सैनिकांनी याआधी आंदोलन केले होते आता पुन्हा एकदा मनसे सैनिक राहता येथे वीजवितरण कार्यालय समोर आंदोलन केले यावेळी अनोख्या पद्धतीने एक आगळेवेगळे बोंबाबोंब कपडे काढून शाशनाला लाज वाटावी यासाठी कपडे उतार आंदोलन मनसेच्या वतीने करण्यात आले.

राहता शहरातील नागरिकांनी कोरोनाच्या काळात आर्थिक परिस्थिती कोलमडली असताना लाईटबील भरू शकले नाही त्यामुळे वीज कापून घेण्यात आली यामुळे मोठ्या प्रमाणात त्रास नागरिकांना सोसावा लागत आहे एकीकडे पैसे मिळत नाहीये आणि एकीकडे लाईटबील घरपट्टी नळपट्टी तसेच पेट्रोल डिझेल वाढ होत आहे ह्या सर्वानाचा भरणा करायचा कसा असे सवाल नागरिक करत आहे.

यासाठी राहता वीजवितरण कार्यालय समोर मनसेच्या वतीने अंदोलन करण्यात आले नागरिकांकडून पूर्ण रक्कम भरण्याची सक्ती करू नये 30-40 टक्के प्रमाणे नागरिकांकडून रक्कम घ्यावी वीजबिल भरण्यासाठी हफ्ते करून दयावे अशा विविध मागण्यासाठी मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

Related Posts
1 of 1,290

यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष विजय मोगल, राहता तालुकाध्यक्ष राजेश लुटे ,पुणतांबा उपतालुकाध्यक्ष गणेश जाधव, उपतालुकाध्यक्ष सुधाकर वाघमारे, शहराध्यक्ष गणेश गाडेकर, शिर्डी शहर संघटक लक्ष्मण कोतकर ,उपशहरध्यक्ष प्रसाद महाले, वाहतूक सेने अध्यक्ष विजय सोमवंशी ,अजिंक्य गाडेकर ,आदित्य सदाफळ ,आदित्य घोडके आदी कारकर्ते उपस्थित होते.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: