राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अभिनंदन,

मुंबई – क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. हॉकीचे जादूगार म्हणून ओळखळे जाते असे हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांना जयंती निमित्त अभिवादन करत, राज्यातील क्रीडा जगताला राष्ट्रीय क्रीडा दिनाच्याही शुभेच्छा दिल्या आहेत.
केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या या पुरस्कारांचे आज भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन येथून वितरण करण्यात आले. या मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार क्रिकेटपटू रोहित शर्मा, महिला कुस्तीपटू विनेश फोगाट, टेबल टेनिसपटू मनिका बत्रा, पॅरालिम्पिकपटू एम. थंगवेलू, हॉकीपटू रानी रामपाल यांना देण्यात आला आहे.
यात महाराष्ट्रातील खेळाडूचा समावेसह होता
अर्जुन पुरस्कार –
घोडेस्वारी अजय सावंत (घोडेस्वारी),Equestrian Ajay Sawant (Equestrian),
राहूल आवारे (कुस्ती), Rahul Aware (Wrestling),
सारिका काळे (खो खो), Sarika Kale (Kho Kho),
दत्तू भोकनाळ (नौकानयन), Dattu Bhokanal (sailing),
मधुरिका पाटकर (टेबल टेनिस), Madhurika Patkar (Table Tennis),
सुयश जाधव (पॅरास्विमिंग), Suyash Jadhav (Paraswimming),
चिराग शेट्टी (बॅडमिंटन), Chirag Shetty (Badminton),
ध्यानचंद पुरस्कार – DhyanChand Award
प्रदीप गंधे (बॅडमिंटन), Pradeep Gandhe (Badminton),
तृप्ती मुरगुंडे (बॅडमिंटन),Trupti Murgunde (Badminton),
सत्यप्रकाश तिवारी ( पॅरा बॅडमिंटन),Satyaprakash Tiwari (Para Badminton),
नंदन बाळ (टेनिस). Nandan Bal (Tennis).
द्रोणाचार्य पुरस्कार – Dronacharya Award
Vijay Munishwar (Para Powerlifting).
विजय मुनीश्र्वर (पॅरा पॉवरलिफ्टिंग).
तेनसिंग नॉरगे पुरस्कार – केवल कक्का (लँड अॅडव्हेंचर) Tenzing Norgay Award – Only Kakka (Land Adventure)
तर लक्ष्य इन्स्टिट्यूट (पुणे) ( pune)आणि इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्टस् मॅनेजमेंट (मुंबई) (mumbai) यांना राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार मिळाला आहे. महाराष्ट्रातील या खेळाडू आणि संस्थांनी आपल्या उत्कृष्ट क्रीडा कामगिरीने राज्याच्या क्रीडा गौरवात अभिमानास्पद भर घातली आहे, असे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी या सर्वांचे आणि देशातील अन्य राज्यातील द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त प्रशिक्षक, अर्जुन पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार आणि तेनसिंग नॉरगे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंचेही अभिनंदन केले आहे.