राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ अध्यक्षपदी तात्याभाऊ घोडकेंची निवड

0 27

 श्रीगोंदा –  प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात आदरणीय पक्षाध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार साहेबांचे राष्ट्रवादी विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या तात्याभाऊ बलभीम घोडके (चांडगाव) यांची सामाजिक न्याय विभागाच्या श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष पदी तसेच श्री. दिपक राजू ससाणे (मढेवडगाव) व श्री. शरद गोरख श्रीराम श्रीगोंदा तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.सदर नियुक्तीपत्र आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. घनश्याम अण्णा शेलार, श्रीगोंदा तालुक्याचे माजी आमदार श्री. राहुल दादा जगताप पाटील व जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष बाबासाहेब भोस, मा. आण्णासाहेब शेलार यांच्या हस्ते देण्यात आले.

           शेतकऱ्यावर लाठीचार्ज नंतर दिल्लीला छावणीचे स्वरूप

या कार्यक्रमाकरिता प्रमुख उपस्थिती लाभलेले श्री. नगराध्यक्ष मनोहर दादा पोटे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड, नगरसेवक राजाभाऊ लोखंडे, नगरसेवक सतीश मखरे सर, नगरसेवक गणेश भोस, नगरसेवक समीर बोरा, प्रवीण भैय्या शेलार व पदवीधर विभागाचे तालुकाध्यक्ष श्री.संजयजी काळे उपस्थित होते.सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष श्री. संदीप उमप, (कार्याध्यक्ष) गोरख तात्या घोडके, (शहराध्यक्ष) राहुल बागे, (शहर उपाध्यक्ष) निखिल पाटोळे, मानव जाधव, सामाजिक न्याय विभागाचे (सरचिटणीस) भीमराज शिंदे, राजू मोटे, राहुल शेठ साळवे, अवि घोडके, सर्व मढेवडगाव, पिसोरे खांड, चांडगावचे मित्र परिवार व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Posts
1 of 1,301

                       धक्कादायक ! एकाच विहिरीत आढळला तरुण आणि तरुणीचा मृतदेह 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: