राष्ट्रवादीने फेसबुक, ट्वीटरकडे केली ‘ही’ मागणी !

0 18

सुशांतसिंह मृत्यू प्रकरणावरून मुंबई पोलिसांची बदनामी करण्यात आली होती. यासाठी फेसबुक आणि ट्वीटरवर फेक अकाउंट्स देखील तयार करण्यात आली होती.याच प्रकरणावरून आता राष्ट्रवादीने फेसबुक, ट्वीटरकडे एक मागणी केली आहे.राष्ट्रवादीने म्हटले आहे की, संबंधित फेक अकाउंट्स कुठल्या आयपी अड्रेसवरून तयार करण्यात आली याची माहिती कंपन्यांनी द्यावी.

याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी भाजपवर थेट आरोप केला आहे. मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न भाजप आयटी सेलमधून झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.दरम्यान सुशांतसिंह राजपूत याने आत्महत्या केल्यानंतर याप्रकरणी पोस्ट टाकण्यासाठी फेसबुक आणि ट्वीटरवर तब्बल ८० हजार फेक अकाउंट्स उघडण्यात आली होती .

Related Posts
1 of 257

झाला प्रकार पाहता या अकाउंट्सच्या मुळाशी जाण्याची गरज असल्याचे तपासे यांनी सांगितली .यासाठी फेसबुक आणि ट्वीटरने याबाबत माहिती द्यायला हवी, अशी मागणी त्यांनी केली .

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: