राष्ट्रवादीत गेलेले नगरसेवक भाजपचे नव्हतेच – भाजप शहराध्यक्ष बिभिषन धनवडे

0 23

जामखेड – दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादीत गेलेले दोन अपक्ष व एक राष्ट्रवादीचा गटनेता यांनी कधीच भाजप प्रवेश केला नव्हता तत्कालीन पालकमंत्री राम शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शहराच्या विकासासाठी ते एकत्र आले होते त्यातील एका अपक्षाला उपनगराध्यक्ष केले होते. त्यांच्या जाण्याने भाजपला धक्का वगैरे होत असलेला अपप्रचार हा धादांत खोटा आहे अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक बिभिषन धनवडे यांनी दिली आहे.


   याबाबत पत्रकारांशी बोलताना शहराध्यक्ष बिभिषन धनवडे म्हणाले, भारतीय जनता पक्ष हा एक विश्वासू राष्ट्रीय पक्ष असून पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या विकासात्मक दुरदृष्टीमुळे जनता त्यांच्याकडे आशेने पाहत असून त्या माध्यमातून कार्यकर्ते जोडण्याचे काम केले जात आहे.  राज्यात सत्ता व मतदार संघाचे प्रतिनिधी राम शिंदे हे कॅबिनेट मंत्री असल्यामुळे जामखेड नगरपरिषदेच्या माध्यमातून शहराचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने अपक्ष, राष्ट्रवादी व शिवसेना नगरसेवकांना बरोबर घेऊन शहरात विकासात्मक कामे झाली आहेत तर काही प्रगतीपथावर आहे सोबत घेतलेले सर्व नगरसेवक अद्यापही आपापल्या पक्षात कार्यरत आहे त्यामुळे भाजपला धक्का म्हणने कितपत योग्य आहे ? असा प्रश्‍न करून शहराध्यक्ष बिभिषन धनवडे म्हणाले शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सोबत घेतलेले नगरसेवक कोणत्या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पक्ष प्रवेश करीत आहे ही शहरातील सुज्ञ नागरिक ओळखून आहे असा टोला धनवडे यांनी पक्षप्रवेश करणा-या नगरसेवकांना लगावला. 

Related Posts
1 of 1,388


  ते पुढे म्हणाले, पुढील वर्षी होणाऱ्या नगरपरिषद निवडणूक भाजप महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहरामध्ये नवचैतन्य निर्माण करून बहुमताने सत्ता करू भारतीय जनता पक्ष शहराच्या विकासासाठी पूर्वीसारखाच कटीबध्द आहे. 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: