DNA मराठी

राष्ट्रवादीच्या आमदारावर गुन्हा दाखल…….

0 137

अकोला- भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाला टोकल्याच्या रागातून अकोल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी पोटात लाथ मारल्याची तक्रार एका ग्रामस्थाने केली आहे.

यावरून राजूर पोलीस ठाण्यात आमदार लहामटे यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंबंधी रामदास लखा बांडे (वय ४०, रा. खडकी, ता. अकोले) यांनी तक्रार दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, खडकी गावातून आपण पायी जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने एक गाडी आली.

Related Posts
1 of 2,488

आम्हाला कट मारून ती पुढे गेली. कोणी तरी पर्यटक असावेत म्हणून आम्ही जोरात ओरडून गाडी हळू चालवा असे म्हणालो. त्यावर काही अंतरावर जाऊन ती गाडी थांबली. त्यातून आमदार लहामटे उतरले व म्हणाले, मला ओळखले का मी कोण आहे. असे म्हणून माझ्या पोटात त्यांनी लाथ मारली व शिवीगाळ करून ते निघून गेले.

रामदास बांडे यांच्या तक्रारीवरून राजूर पोलीस ठाण्यात आमदार लहामटे यांच्याविरूद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: