राष्ट्रवादीकडून मनोज कोतकर तर शिवसेने कडून योगीराज गाडे यांना सभापती निवडणूकसाठी संधी 

0 117

अहमदनगर –  महानगरपालिकेत स्थायी समिती सभापती निवडणुक २५ रोजी ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहे. त्यामुळे शहरात  पुर्ण क्षमतेने राजकीय डावपेच सुरू झाले आहे. स्थायी समिती सभापतीपदासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत संध्याकाळी काळी पर्यंत आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने मोठी खेळी करीत भाजपच्या मनोज कोतकर यांना राष्ट्रवादीत प्रवेश देत त्यांचा अर्ज दाखल केला आहे. आ.संग्राम जगताप यांचे समर्थक असलेले मनोज कोतकर हे मनपा निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर विजयी झालेले आहेत. सध्या राज्यात शिवसेना,राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार आहे.

Related Posts
1 of 2,079

 नगरमध्ये जर राष्ट्रवादी भाजपा साबोत गेली तर राज्यात याची प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. यामुळे राष्ट्रवादीने मनोज कोतकर यांना पक्षात घेऊन सभापतीपदाची संधी दिली. दुसरीकडे महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष शिवसेनाने सुद्धा स्थायी समिती निवडणूक लढवण्यासाठी नगरसेवक योगीराज गाडे यांना संधी दिली आहे. यामुळे उद्या होणारी सभापती निवड रंगतदार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: