DNA मराठी

रामायण, महाभारत नंतर दूरदर्शनचा खाजगी वाहिन्यांना आणखी एक झटका; टीव्हीवर दिसणार…

0 83
Related Posts
1 of 2,492

भारतामध्ये सध्या २१ दिवसांचे लॉकडाऊन सुरु आहे. या काळात नागरिकांनी घरातच राहावे, असे आवाहन सरकारने केले आहे. पण यावेळी क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी घोषणा भारत सरकार आणि बीसीसीआयने केली. कोरोना विषाणूमुळे भारतातील काही स्पर्धा रद्द कराव्या लागल्या आहेत, तर यंदाची आयपीएल १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. सध्या कोणत्याही देशात कोणतीही क्रीडा स्पर्धा सुरु नाही. भारतामध्ये क्रिकेट सर्वाधिक खेळले जाते,असे म्हटले जाते. पण सध्या भारतामध्येही क्रिकेट सुरु नाही. यामुळे क्रिकेट चाहते निराश आहेत. पण भारतातील क्रिकेट चाहत्यांनी निराश होऊ नये, यासाठी आता सरकारने एक निर्णय घेतल्याचे दिसते. भारतातील चाहत्यांना लाईव्ह क्रिकेट पाहायला आवडते, पण त्यांना क्रिकेटच्या आठवणींमध्येही रमायला आवडते. हीच गोष्ट भारत सरकारने जाणली. त्यामुळे आता डीडी स्पोर्ट्स वाहिनीवर भारत सरकार आणि बीसीसीआय यांनी एकत्रित येऊन काही जुने सामने दाखवायचे ठरवले. हे सामने २००० या वर्षांच्या आसपासचे असतील, असेही म्हटले जाते.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: