राफेल नदालने फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा जिंकून, फेडररच्या २० ग्रॅँडस्लॅमशी केली बरोबरी

0 35

पॅरिस – लाल मातीच्या कोर्टवरील आपला वर्चस्व गाजवणारा स्पेनच्या राफेल नदालने यांनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचला तीन सेटमध्ये पराभूत करीत नदालने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचे ऐतिहासिक १३व्यांदा जेतेपद पटकावले.

तसेच ‘विजेतेपदाला नसे विसावा’ हे सिद्ध करताना रॉजर फेडररच्या पुरुष एकेरीतील विक्रमी २० ग्रॅँडस्लॅम विजेतेपदांची बरोबरीसुद्धा त्यांनी केली आहे.

दुसऱ्या मानांकित नदालने यंदाच्या फ्रेंच स्पर्धेत एकही सेट गमावला नाही. या कामगिरीची पुनरावृत्ती नदालने अंतिम फेरीत अग्रमानांकित जोकोव्हिचसारख्या प्रतिस्पध्र्याविरुद्धही कायम राखली. नदालने ही लढत ६-०, ६-२, ७-५ अशी दोन तास आणि ४१ मिनिटांत जिंकली.

Related Posts
1 of 1,403

पहिल्या सेटमध्ये नदालने एकही गेम जिंकण्याची संधी जोकोव्हिचला दिली नाही. दुसऱ्या सेटमध्ये जोकोव्हिचने दोन गेम जिंकले परंतू नदाल सरस ठरला. तिसऱ्या गेममध्ये मात्र जोकोव्हिचने पहिल्या गेमपासून नदालला चुरस दिली. तिसऱ्या सेटमध्ये ५-४ या आघाडीवर जोकोव्हिच होता. मात्र तेथून सलग तीन गेम जिंकत नदालने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

फेडररच्या २० ग्रॅँडस्लॅमशी बरोबरी –
स्वित्र्झलडच्या रॉजर फेडररच्या विक्रमी २० ग्रॅँडस्लॅम विजेतेपदांची बरोबरी नदालला करता आली. फेडररला २० ग्रॅँडस्लॅम विजयात फ्रेंच खुली स्पर्धा (२००९) एकदाच जिंकता आली होती.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: