राज्य सरकारने जाहीर केलेल्या योजनेचे लाभ पत्रकारांना मिळावा – कर्जत तालुका पत्रकार संघ

कर्जत – राज्य सरकारने जाहीर केलेल्या योजनेचा लाभ पत्रकार बांधवांना मिळावा अशी मागणी कर्जत तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली. – राज्यातील पत्रकार बांधवांना ५० लाख रुपयांचा कोरोना विमा तसेच प्रत्येक तालुक्यात पत्रकार बांधवांना कोरोना उपचारासाठी बेड आरक्षीत ठेवणे या निर्णयाची अंमलबजावणी करावी अशी मागणी आज कर्जत तालुका पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदार नानासाहेब आगळेे यांना निवेदन देऊन करण्यात आली.
राज्यात आता पर्यंत कोरोना मुळे २५ पत्रकार बांधवांचा बळी गेला आहे. मात्र पत्रकारांसाठी झालेल्या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी झाली नाही ती तात्काळ करण्यात यावी अशी मागणी कर्जत तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली यावेळी अहमदनगर जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश जेवरे, कर्जत तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नययुम पठाण, सचिव मच्छिंद्र अनारसे, कार्याध्यक्ष निलेश दिवटे, आशिष बोरा, मोतीराम शिंदे, सुभाष माळवे, अफरोज पठाण, आदी उपस्थित होते.