राज्य मंत्रिमंडळाच्या या निर्णयाचे रोहित पवार यांनी केले स्वागत

कर्जत- राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोलीस शिपाई चे १२ हजार५२८ पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयाचे स्वागत राष्ट्रवादीचे कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांनी केला आहे त्यांनी एका ट्विट करून सांगितले की राज्याचे तरुणाच्या वतीने मुख्यमंत्री तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या खूप आभार .
मेगा भरती राबवत असताना आधी मैदानी परीक्षा नंतर लेखी परीक्षा द्यावी तसेच या दोन्ही परीक्षा १००- १०० गुणांचे घ्यावे यात राज्यातील तरुणाच्या मागणीच्या मंत्रिमंडळाने विचार करावा अशी विनंती सुद्धा त्यांनी केली.
मागच्या काही वर्षापासून आपल्या पोलीस भरतीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिरवा कंदील दाखवण्यात आला होता .या निर्णयाचे स्वागत सर्व स्थळावरून होत आहे तसेच या निर्णयामुळे राज्यातील बेरोजगार तरुण आणि तरुणाईला याचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे.