राज्यात होणार पोलीस भरती….!

मुंबई – राज्यात पोलीस भरतीसाठी मागच्या २ वर्षा पासून प्रतिक्षेत असलेल्या राज्यातील तरुण आणि तरुणी यांना राज्य मंत्री मंडळाने मोठा दिलासा दिला आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत पोलिस शिपायांची १२ हजार ५२८ रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बैठकीनंतर ही माहिती पत्रकारांना दिली. पोलीस भरतीची प्रक्रिया आणि वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. एवढी मोठी मेगाभरती ही राज्यात प्रथमच होत आहे .
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. पोलीस दलातील सर्व साडेबारा हजार रिक्त पदे भरण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला २०१९ मध्ये ५२९७ पदांच्या भरतीसाठी जाहिरात काढली होती परंतु कोरोनाच्या प्रभावा मुळे राज्य शासनाने ही भरती पुढे ढकलण्याचे आदेश दिले होते . त्यामुळे पोलीस भरती होईल किंवा नाही याबाबत शंका होती .आता मंत्रिमंडळाचे निर्णया नुसार येणाऱ्या काळात राज्यातील हजारो बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बैठकी नंतर दिली आहे.
नव्या भरतीमुळे सध्याचे यंत्रणेवर कोरोना मुळे निर्माण झालेला भार हलका होण्यास मदत होईल तसेच पोलिस शिपाई भरती प्रक्रिया जलद आणि पारदर्शक रित्या पूर्ण केली जाईल असे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले. परंतु मराठा आरक्षणवर सर्वोच्च न्यायालयाने घालण्यात आलेल्या स्थगिती मुळे ही १२ हजार ५२८ रिक्त पदाची पोलीस भरती कधी जाहीर होणार हे पाहावा लागणार आहे .