DNA मराठी

राज्यात निर्बंध कायम उद्धव ठाकरेचे संकेत

0 65
Related Posts
1 of 2,492

जून महिन्यापासून राज्यात सुरु झालेला मिशन बिगीन अगेन सुरु करुन लॉकडाउनचे नियम टप्प्या टप्यानं संपणार आहे. काही राज्यांनी पटापट निर्णय घेऊन व्यवहार पूर्ण चालु केले आहे. परंतू असे असले तरीही राज्य सरकार कोणतही घाई- गडबड करणार नाही. यामुळे एक सप्टेंबरपासून राज्यात लॉकडाउन पूर्णपणे उठणार नसल्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका बैठकीदरम्यान दिले आहेत.यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबई महानगर क्षेत्रातील शहरांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत आहे. परंतु त्याने हुरळून गेलो तर संकटाला आमंत्रण दिल्यासारखे होईल आणि कौतुकाने हुरळून जाऊन गाफील राहता येणार नाही. त्यामुळे अन्य राज्यांनी काही गोष्टी  केल्या असल्या तरी मात्र महाराष्ट्र तसे करणार नाही. जोपर्यंत खात्री पटत नाही तोपर्यंत काही निर्बंध शिथिल करता येणार नाहीत. जगभरात काही देशांनी काही गोष्टी घाईगडबडीने सुरु केल्या. पण महाराष्ट्रत तशी गडबड करणार नाही.कारण आपण ज्या गोष्टी सुरू केल्या आहेत. त्या पुन्हा बंद होणार नाहीत याची राज्य सरकार दक्षता घेत आहेत. पण ज्या गोष्टी सध्या उघडणे शक्य नाही, किंवा त्या उघडल्यानंतर करोनाचा प्रादुर्भाव किती वाढेल. याची खात्री नाही त्या सुरु केल्या जाणार नाही असे मुख्यंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: