राज्यात कोविडसंदर्भात २ लाख ३२ हजार गुन्हे दाखल; ३३ हजार ७७४ व्यक्तींना अटक


मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख ३२ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ३३ हजार ७७४ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे तसेच २२ कोटी ०६ लाख १५ हजार ९९४ रु. दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च ते २२ ऑगस्ट या कालावधीत अत्यावश्यक सेवेसाठी ७ लाख ७४ हजार २०३ पास पोलिसांमार्फत देण्यात आले आहेत. पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – ३३५ (८९० व्यक्ती ताब्यात)
१०० नंबरवर आलेले फोन – १ लाख १० हजार ८५७राज्यभरात ज्यांच्या हातावर क्वारंटाईन असा शिक्का आहे, अशा ८२९ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – १३४७
जप्त केलेली वाहने – ९५, ९७७ कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना मृत्युमुखी पडलेले पोलीस –कोरोना बाधित पोलीस – ३२६ पोलीस अधिकारी व २१७८ पोलीस कर्मचारीकोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग अपेक्षित आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.