राज्यात कमी होत आहे कोरोना रुग्ण  

0 123

मुंबई –  राज्यात गेल्या अनेक दिवसानंतर आज कमी संख्येने नवीन निदान झालेल्या रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. आज दिवसभरात ११ हजार ९२१ रुग्णांची नोंद झाली असून १९ हजार ९३२ रुग्णांना घरी सोडण्यात आले. राज्याच्या रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ होत असून आज ७७.७१ टक्के नोंद झाली आहे. आतापर्यंत १० लाख ४९ हजार ९४७ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या २ लाख ६५ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत,असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  सांगितले.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६६ लाख २२ हजार ३८४ नमुन्यांपैकी १३ लाख ५१ हजार १५३ नमुने पॉझिटिव्ह ( २०.४० टक्के) आले आहेत. राज्यात  १९ लाख  ७५ हजार ९२३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २९ हजार ९२२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज १८० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६५ टक्के एवढा आहे.

Related Posts
1 of 2,075

आज निदान झालेले ११,९२१ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले १८० मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) :

मुंबई मनपा-२०५५ (४०), ठाणे- २३६ (१), ठाणे मनपा-३०४ (१२), नवी  मुंबई मनपा-३९२ (५), कल्याण डोंबिवली मनपा-२९३ (१), उल्हासनगर मनपा-३९ (२), भिवंडी निजामपूर मनपा-१०, मीरा भाईंदर मनपा-२१८ (३), पालघर-३२ (१), वसई-विरार मनपा-१४० (१), रायगड-१७९ (१), पनवेल मनपा-२००, नाशिक-२११ (३), नाशिक मनपा-२७०, मालेगाव मनपा-२५, अहमदनगर-३०२, अहमदनगर मनपा-८८ (१), धुळे-१२, धुळे मनपा-११, जळगाव-८८ (३), जळगाव मनपा-३३ (१), नंदूरबार-९७, पुणे- ६०६ (८), पुणे मनपा-७९९ (६), पिंपरी चिंचवड मनपा-५०५ (५), सोलापूर-१६४ (४), सोलापूर मनपा-४९, सातारा-४६० (१२), कोल्हापूर-२३० (७), कोल्हापूर मनपा-७३ (३), सांगली-३१० (५), सांगली  मिरज कुपवाड मनपा-१०८ (३), सिंधुदूर्ग-१०१, रत्नागिरी-८१ (१), औरंगाबाद-७४ (१),औरंगाबाद मनपा-१३१ (४), जालना-१३३, हिंगोली-४९ (५), परभणी-२३, परभणी मनपा-१२, लातूर-१६३ (१), लातूर मनपा-५५, उस्मानाबाद-२२४ (३), बीड-१७६ (२), नांदेड-६३ (१), नांदेड मनपा-१३२, अकोला-११, अकोला मनपा-४१ (१), अमरावती-९० (२), अमरावती मनपा-६५ (३), यवतमाळ-९७ (८), बुलढाणा-८२ (१), वाशिम-३५, नागपूर-२०० (१), नागपूर मनपा-५७८ (१), वर्धा-६७, भंडारा-१६४, गोंदिया-२२८, चंद्रपूर-१४१ (५), चंद्रपूर मनपा-६६ (९), गडचिरोली-८१ (३), इतर राज्य- १९.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: