राज्यात उपचार सुरू असलेल्या कोरोना रुग्णांची संख्यात होत आहे घट  

0 40

मुंबई –  राज्यात आज सलग दुसऱ्या दिवशी बरे झालेल्यांच्या तुलनेत नवीन निदान झालेल्या रुग्णांची संख्या कमी आली आहे. आज दिवसभरात २३ हजार ६४४ रुग्ण बरे होऊन घरी  सोडण्यात आले असून २० हजार ४१९ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १० लाख १६ हजार ४५० वर पोहोचली असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६.९४ टक्के एवढे झाले आहे. राज्यभरात सध्या २ लाख ६९ हजार ११९ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

आज निदान झालेले २०,४१९ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ४३० मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) :

मुंबई मनपा-२२८२ (४४), ठाणे- २५६ (३), ठाणे मनपा-४०१ (८), नवी  मुंबई मनपा-४०३ (९), कल्याण डोंबिवली मनपा-४०८ (२६), उल्हासनगर मनपा-४८, भिवंडी निजामपूर मनपा-३३, मीरा भाईंदर मनपा-१९७ (१०), पालघर-१६३ (२), वसई-विरार मनपा-२१० (१), रायगड-३१८ (६), पनवेल मनपा-२०० (१), नाशिक-४३५ (८), नाशिक मनपा-११६० (९), मालेगाव मनपा-३२ (१), अहमदनगर-५२५ (६),अहमदनगर मनपा-१७२ (२), धुळे-२६, धुळे मनपा-२४, जळगाव-२३८ (९), जळगाव मनपा-११९ (१), नंदूरबार-७९, पुणे- १३९० (२३), पुणे मनपा-१७९६ (६३), पिंपरी चिंचवड मनपा-११३८ (४), सोलापूर-६०१ (१५), सोलापूर मनपा-१०२ (३), सातारा-८४९ (२१), कोल्हापूर-४९५ (२२), कोल्हापूर मनपा-१८३ (५), सांगली-५२४ (२१), सांगली  मिरज कुपवाड मनपा-२५५ (७), सिंधुदूर्ग-९६ (२), रत्नागिरी-१४४ (५), औरंगाबाद-१४५ (२),औरंगाबाद मनपा-२४४ (६), जालना-८८ (१), हिंगोली-६७, परभणी-५८ (५), परभणी मनपा-३० (७), लातूर-११७ (२), लातूर मनपा-९७ (२), उस्मानाबाद-२२४ (११), बीड-२०२ (२), नांदेड-१४१ (२), नांदेड मनपा-२१६ (३), अकोला-१८, अकोला मनपा-७५, अमरावती-७० (१), अमरावती मनपा-१२८ (३), यवतमाळ-२८६ (७), बुलढाणा-२०२ (४), वाशिम-५७ (१), नागपूर-५१८ (४), नागपूर मनपा-१११७ (११), वर्धा-२६४ (५), भंडारा-१९२, गोंदिया-२५७, चंद्रपूर-१५५ (३), चंद्रपूर मनपा-१२९ (६), गडचिरोली-९०, इतर राज्य- ३० (५).

Related Posts
1 of 1,377

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६३ लाख ६९ हजार ६७६ नमुन्यांपैकी १३ लाख २१ हजार १७६ नमुने पॉझिटिव्ह ( २०.७४ टक्के) आले आहेत. राज्यात  १९ लाख  ४५ हजार ७५८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३० हजार ५७१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ४३० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६६ टक्के एवढा आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: