DNA मराठी

राज्यात आज नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक

0 145

मुंबई – राज्यात आज बरे झालेल्या रुग्णांच्या तुलनेत नवीन निदान झालेल्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. आज दिवसभभरात १९ हजार ५९२ रुग्ण बरे होऊन घरी  सोडण्यात आले असून १७ हजार ७९४ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ९ लाख ९२ हजार ८०६ वर पोहोचली असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६.३३ टक्के एवढे झाले आहे. राज्यभरात सध्या २ लाख ७२ हजार ७७५ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

आज निदान झालेले १७,७९४ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ४१६ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) :

Related Posts
1 of 104

मुंबई मनपा-१८७६ (४८), ठाणे- २५७ (२), ठाणे मनपा-४१५, नवी  मुंबई मनपा-४११ (८), कल्याण डोंबिवली मनपा-३३९ (३), उल्हासनगर मनपा-२६, भिवंडी निजामपूर मनपा-३३, मीरा भाईंदर मनपा-१८२ (५), पालघर-१४७ (८), वसई-विरार मनपा-१७३ (५), रायगड-३३९ (१६), पनवेल मनपा-२६४ (२), नाशिक-२५१ (७), नाशिक मनपा-६७३ (३१), मालेगाव मनपा-२८ (४), अहमदनगर-५०२ (९),अहमदनगर मनपा-२०३ (७), धुळे-६२, धुळे मनपा-२९, जळगाव-४८३ (१५), जळगाव मनपा-२०४, नंदूरबार-४८ (१), पुणे- ११६२ (२७), पुणे मनपा-१५५३ (१९), पिंपरी चिंचवड मनपा-८०६ (१०), सोलापूर-४७७ (३), सोलापूर मनपा-८२ (२), सातारा-६४७ (१९), कोल्हापूर-३९२ (२८), कोल्हापूर मनपा-१३८ (३), सांगली-५१७ (१९), सांगली  मिरज कुपवाड मनपा-१७४ (१), सिंधुदूर्ग-९२ (१), रत्नागिरी-५७ (२), औरंगाबाद-१९२ (१),औरंगाबाद मनपा-२५७ (७), जालना-१६३ (१), हिंगोली-४१, परभणी-६० (२), परभणी मनपा-३० (१), लातूर-२२४ (५), लातूर मनपा-१४२ (१), उस्मानाबाद-१८६ (३), बीड-२०६ (२), नांदेड-११३, नांदेड मनपा-७८, अकोला-४९, अकोला मनपा-६९ (२), अमरावती-१२१ (४), अमरावती मनपा-१३५ (२), यवतमाळ-१८२ (१), बुलढाणा-१७२, वाशिम-६४(२), नागपूर-३१९ (१२), नागपूर मनपा-११९० (४१), वर्धा-७८ (४), भंडारा-१०८ (३), गोंदिया-३२८ (८), चंद्रपूर-८४ (१), चंद्रपूर मनपा-५६ (४), गडचिरोली-७४, इतर राज्य- ३१ (४).

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६२ लाख ८० हजार ७८८ नमुन्यांपैकी १३ लाख ७५७ नमुने पॉझिटिव्ह ( २०.७१ टक्के) आले आहेत. राज्यात  १९ लाख  २९ हजार ५७२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३२ हजार ७४७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ४१६ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६७ टक्के एवढा आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: