राज्यसभेत गोंधळ :’त्या’ आठ खासदारांचे निलंबन !

सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनात अनेक मतभेद होताना दिसत आहेत, त्यातून गोंधळाची परिस्थिती निर्माण होत आहे. रविवारी तर भर राज्यसभेत गोंधळ तर झालाच सोबत धक्काबुक्कीही झाली .झालेल्या प्रसंगाला गांभीर्याने घेत धक्काबुक्की करणाऱ्या आठ खासदारांवर कारवाई करण्यात आली आहे. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी कारवाई करत त्या आठ खासदारांना निलंबित केले आहे.व्यंकय्या नायडू यांनी या घटनेची निंदा करत संबंधित खासदारांना एका आठवड्यासाठी निलंबित केले आहे.
संजय सिंह, ,डेरेक ओ ब्रायन ,राजू सातव, के के रागेश, रिपून बोरा, डोला सेन, सय्यद नझीर हुसैन आणि एलामारन करिम यांचा निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये समावेश आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनच्या सातव्या दिवशी कृषि विधेयकांवर चर्चा आणि मतदान सुरू होते , त्याचवेळी विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला आणि तोडफोड देखील केली .
गोंधळ घालताना खासदारांनी सभागृहातच नियम पुस्तिका फाडली आणि माईकही तोडले. झालेल्या प्रकारानंतर सभागृहाचे कामकाज १०.०० वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले होते .कामकाज पुन्हा सुरु झाल्यावरदेखील पुन्हा खासदारांनी गोंधळ घातला , त्यानंतर पुन्हा सभागृहाचे कामकाज १०.३६ पर्यंत स्थगित केले गेले.