राऊत-फडणवीस भेटीवर काय म्हणाले चंद्रकांत पाटील , जाणून घ्या !

काही दिवसांपूर्वीच संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. या भेटीमुळे शिवसेनेचे काही मंत्रीदेखील नाराज होते. या प्रकरणावर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे , जर राजकीय चर्च होते. दोन-अडीच तास चहा बिस्कीटावर तर चर्चा होणार नाही .तसेच ही कोणतीही निर्णयात्मक बैठक नव्हती असेही पाटलांनी स्प्ष्ट केले आहे.
तसेच चंद्रकांत पाटील यांनी राज्यात मध्यावधी निवडणुकांसारखी परिस्थिती असल्याचे म्हटले आहे.पाटलांनी पुढे म्हटले आहे की, राज्यता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे सरकार आहे पण त्यांच्यामध्ये समन्वय नाही.
पाटलांनी पुढे स्पष्ट केले की, आज निवडून आलेले आमदार उद्या असतील की नाही ते ठाऊक नसते. या कारणामुळे मध्यावधी निवडणुका कुणालाच नको आहेत.मात्र कुणाचीच मते जुळली नाहीत, तर काहीच पर्याय उरणार नाही.