राऊत-फडणवीस भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ : नेत्यांनी उपस्थिती केले ‘हे’ प्रश्न !

नुकतीच शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट झाली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे आणि अनेक राजकीय मंडळी नाराज असल्याचे वृत्त आहे. या भेटीमुळे शिवसेनेत सुद्धा नाराजीचे सूर उमटले आहेत .
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भाजपने बदनामी केली त्यांचासोबत कशाला जायचे, असे प्रश्न शिवसेनेच्या नेत्यांकडून विचारण्यात येत आहेत .यावरून असं स्पष्ट होत आहे की , संजय राऊत-फडणवीस भेटीमुळे शिवसेनेचे काही नेते नाराज झाले आहेत .आदित्य ठाकरे यांच्यासाठी संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आणि याची जाणीव त्यांनाच राहिली नाही अशी टीकादेखील काही मंत्र्यानी केली आहे.
संजय राऊत आणि फडणवीस भेटीमुळे शिवसेनेकडून एका प्रकारे राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर दबाव टाकण्याचे सोपे झाले आहे. शरद पवार यांनीदेखील उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केला,यावेळी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातदेखील उपस्थित होते.