यूपीएससी परीक्षा पुढे ढकलता येणार नाही- केंद्रीय लोकसेवा आयोग

0 45

नवी दिल्ली- यूपीएससी पूर्व परीक्षा बाबत सर्वोच्च न्यायालयात परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात भूमिका मांडताना आता परीक्षा पुढे ढकलणे अशक्य असल्याचं आयोगानं म्हटलं आहे.

करोनामुळे शालेय आणि महाविद्यालयीन परीक्षांसह इतर परीक्षांनाही रद्द करण्यात आले होते. या मुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून सुद्धा यूपीएसी परीक्षां लांबणीवर टाकण्यात आली होती. परंतू आता परीक्षांचं सुधारित वेळापत्रक जाहीर झालं असून, ४ ऑक्टोबर रोजी पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे.


काही उमेदवारांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय खंठपीठासमोर सोमवारी सुनावणी झाली. यावेळी केंद्रीय लोकसेवा आयोगानं परीक्षा पुढे ढकलणे अशक्य असल्याचं न्यायालयाला सांगितलं.

Related Posts
1 of 1,371

परीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाली असून, आता परीक्षा पुढे ढकलणे अशक्य आहे, अशी माहिती आयोगानं न्यायालयात दिली आहे.  या याचिकेवर आता बुधवारी अर्थात ३० सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
यूपीएससी परीक्षा  पुढे ढकलता येणार नाही- केंद्रीय लोकसेवा आयोग

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: