युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने प्लाझ्मा आणि रक्तदान शिबिर संपन्न

0 183

अहमदनगर  –   महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित  तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने प्लाझ्मा डोनेशन आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दात्यांनी उत्साहात मोठ्या संख्येने रक्तदान आणि प्लाझ्मा दान केले. रक्तदान करणाऱ्या दात्यांबरोबरच नगर शहरातील १०१ दात्यांनी कोविड प्लाझ्मा डोनेशनसाठी संकल्प पत्र भरत या उपक्रमामध्ये आपला सहभाग नोंदविला आहे. 

यावेळी बोलताना शहर जिल्हाध्यक्ष काळे म्हणाले की, सत्यजित तांबे महाराष्ट्रातील एक सृजनशील नेते आहेत. त्यांनी स्वकर्तृत्वावर राज्य पातळीवरील स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. प्लाजमा आणि रक्तदान शिबिराच्या माध्यमातून कोरोनाच्या संकट कालावधीमध्ये गरजू रुग्णांना प्लाझ्मा आणि रक्त उपलब्ध व्हावे यासाठी अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या आवाहनाला प्रतिसाद देत १०१ दात्यांनी आपले संकल्पपत्र भरून दिले आहे. यामुळे अनेक कोरोनाग्रस्तांचे प्राण वाचवण्यासाठी मदत होणार असल्यामुळे दात्यांनी दाखवलेल्या सहकार्याबद्दल काळे यांनी यावेळी दात्यांचे आभार मानले. 

Related Posts
1 of 2,057

काळे यांनी आवाहन केले आहे की, कोरोना झालेल्या ज्या रुग्णांना प्लाझ्माची गरज भासेल त्यांनी शहर काँग्रेसशी संपर्क साधावा. आम्ही त्यांना संकल्पपत्र दिलेल्या दात्याच्या   माध्यमातून आवश्यक त्या रक्तगटाचा प्लाझ्मा तात्काळ उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक तो समन्वय साधू. अजूनही दात्यांची मोठ्या प्रमाणावर गरज असल्यामुळे प्लाझ्मा दान करू इच्छिणाऱ्या दात्यांनी पुढे यावे, असे आवाहन काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या पुढाकारातून अर्पण ब्लड बँक येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काळे यांच्यासह ज्येष्ठ नेते दीप चव्हाण, विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष दानिश शेख, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष अज्जूभाई शेख, आदी उपस्थित होते.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: