युवक काँग्रेसची शहीद शेतक-यांना श्रध्दाजंली

0 28

जामखेड – अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेस, जामखेड तालुका व शहर युवक काँग्रेसच्या वतीने सध्या देशभर गाजत असलेल्या शेतकरी विरोधी काळ्या कायद्यांविरोधात सुमारे ४४ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनातील शहीद झालेल्या निष्पाप ५७ शेतक-यांना मेणबत्ती प्रज्वलित करून श्रध्दाजंली वाहण्यात आली.

भारतीय युवक काँग्रेस कडून आज देशभर “एक दिया शहीदो के नाम” हा कार्यक्रम घेण्यात येत आहे या अनुषंगाने बाजार तळ येथे सायंकाळी ठिक ६ वा मेणबत्ती प्रज्वलित करून ६ मिनिटे श्रध्दाजंली वाहण्यात आली.

या बाबत माहीती देताना युवक काँग्रेसचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष राहुल उगले म्हणाले, “ केंद्र सरकार शेतकर्‍यांवर होणारे अत्याचार संपविण्यास तयार नाही. इतका कडाडून विरोध होत असतानाही हे बिल मागे घेतले जाणार नाही, अशी सरकार हट्टीपणे बसली आहे. सरकारच्या या चिकाटीमुळे आतापर्यंत ५७ निष्पाप शेतकर्‍यांचा निदर्शनादरम्यान दिल्लीच्या सीमेवर मृत्यू झाला आहे. अजूनही पंतप्रधानांचे हृदय वितळत नाही आणि ते आपल्या अहंकारात व्यस्त आहेत.

अन्नदात्याचा मान हा भारताचा अभिमान आहे. शेतकर्‍यांच्या या बलिदानाने संपूर्ण देश दु: खी आहे. हे सर्व पाहता देशातील तरूणांनी आज ८ तारखेला ६ वाजता ६ मिनिटांसाठी मेणबत्ती लावून या शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा निर्णय घेतला आहे.

Related Posts
1 of 1,301

आपल्या भविष्यासाठी सरकारी यंत्रणेशी लढा देताना दिल्ली सीमेवर मरण पावलेला अशा शेतकर्‍यांना ही आमची श्रद्धांजली आहे. आम्ही तुमच्या बलिदानास व्यर्थ जाऊ देणार नाही आणि येणा-या पिढ्या तुमचे बलिदान कायम लक्षात ठेवतील”असे उगले म्हणाले.

या प्रसंगी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष राहुल उगले, जामखेड शहर काँग्रेस अध्यक्ष देविदास भादलकर, तालुका युवक अध्यक्ष शिवराजे घुमरे, शहर युवक अध्यक्ष विक्रांत अब्दुले,विशाल लोहकरे, व युवक काँग्रेस चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: