या मुळे वाढणार चीन आणि पाकिस्तानची चिंता

0 168

नवी दिल्ली – भारत आणि इस्रायलमधील संरक्षण सहकार्य संबंध अधिक भक्कम करण्यासाठी आणखी एक पाऊल उचलण्यात आले आहे. चीन आणि पाकिस्तानसाठी निश्चित ही चिंता वाढवणारी बातमी आहे कारण भारत इस्रायलकडून शस्त्रास्त्रांची आयात करतोच, पण आता भविष्यात दोन्ही देश मिळून, अत्याधुनिक हाय-टेक शस्त्रास्त्रांची निर्मिती करणार आहेत. दोघांनी मिळून बनवलेल्या या हाय-टेक शस्त्रास्त्रांची मित्र राष्ट्रांना निर्यात करण्याची योजना आहे. भारत आणि इस्रायलमध्ये झालेला हा करार म्हणजे चीन पाकिस्तानसाठी निश्चित एक झटका आहे.

भारतीय आणि इस्रायली संरक्षण सचिवांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण सहकार्यासंबंधी एक गट कार्यरत आहे. आता आणखी एका सबग्रुपची स्थापना करण्यात आली आहे. या सब वर्किंग ग्रुपवर तंत्रज्ञान हस्तांतरण, संयुक्त विकास आणि उत्पादन, टेक्नोलॉजी सुरक्षा, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, कल्पकतेला चालना देणे आणि तिसऱ्या देशांना संयुक्त निर्यातीची जबाबदारी असणार आहे.

Related Posts
1 of 2,047

मागच्या दोन दशकांपासून भारताला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणाऱ्या पहिल्या चार देशांमध्ये इस्रायल आहे. इस्रायल भारताला दरवर्षी एक अब्ज डॉलर्सपर्यंत संरक्षण सामुग्रीची निर्यात करतो. भारतातील संरक्षण उद्योगही आता मजबूत झाला आहे. त्यामुळे दोन्ही देशांनी एकत्र येऊन संयुक्त संशोधन-विकास आणि उत्पादन निर्मिती करण्याची गरज निर्माण झाली आहे असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: