‘या’ प्रकरणी राहुल गांधी गप्प का :बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांचा सवाल !

0 29

उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणामुळे देशभरात तणावाचे वातावरण आहे.या संतप्त घटनेमुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका होत आहे.पीडितेच्या कुटुंबियांना भेटायला जाताना राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासोबतदेखील गैरव्यवहार झाला होता .आता बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी राहुल गांधी यांना सवाल केला आहे .

बिहारमधील पूर्णियात राजदच्या माजी सचिवांची हत्येची घटना घडली. या घटनेवरून राहुल गांधी गप्प का असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.पुर्णिया जिल्ह्यात एका दलित नेत्याची शक्ती मलिक याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती .या वरून देखील बिहारमध्ये संतापाचे वातावरण आहे. या प्रकरणी राहुल गांधी गप्प का असा खोचक सवाल सुशील कुमार मोदी यांनी विचारला आहे.

Related Posts
1 of 253

सुशील कुमार मोदी यांनी म्हटले आहे की, सामाजिक न्यायाचं ढोंग करणाऱ्यांनी उमेदवारांची यादी जाहीर करण्यापूर्वी पुर्णियात सामाजिक न्यायाचा बळी दिला. निवडणुकीपूर्वी झालेली ही हिंसा राजद महागात पडेल .

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: