या प्रकरणावरून कंगना ने परत केला शिवसेना वर हल्ला….

मुंबई – मुंबईमध्ये सुरु असलेल्या कंगना आणि शिवसेना संघर्षचा मुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता शिवसेना कार्यकर्त्यांनी एका नौदलाच्या निवृत्त अधिकाऱ्याला बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. यावरुन राजकीय टीका सुरु झाले आहे. अभिनेत्री कंगना रनौतनं देखील एक व्हिडीओ ट्वीट करून या प्रकरणा वरून पुन्हा ठाकरे सरकारवर हल्ला केला आहे. कांदिवलीच्या ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये मदन शर्मा हे निवृत्त नौसेना अधिकारी राहतात. त्यांनी महानगर १ नामक एका व्हाट्सअँप ग्रुप मध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत एक आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्या पोस्टमुळे नाराज शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांचे घर गाठले आणि त्यांना बेदम मारहाण केली.या वरून कंगना ने एक व्हिडिओ ट्विटर करून पुन्हा शिवसेना आणि उद्धव ठाकरे वर हल्ला केला आहे.
व्हिडिओ मध्ये कंगना म्हणाली की, महाराष्ट्रामध्ये सरकारचा आतंक दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज शिवसेना कार्यकर्त्यांनी दिवसाढवळ्या सर्वांसमोर एका माजी सैनिकाला बेदम मारहाण केली. इतक्या लोकांनी एका माणसाला मारहाण केली. त्यांची चूक एवढीच होती की त्यांनी सरकारवर टीका केली असं कंगनानं त्या विडिओ मध्ये म्हटलं आहे.
या प्रकरणात भारतीय जनता पक्षाने सुद्धा शिवसेना वर हल्ला केला आहे- ही घटना अत्यंत निषेधार्ह असून गुंडाराज थांबवा अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यावर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार अतुल भातखळकर यांनी देखील व्हिडीओ ट्वीट करत सरकार वर हल्ला केला आहे. या प्रकरणी समता नगर पोलिसांनी सहा जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविला आणि त्यांना तात्काळ अटक देखील करण्यात आली आहे.