DNA मराठी

या प्रकरणात संदीप देशपांडे यांना होऊ शकते अटक

0 208

मुंबई- सर्वसामान्यांसाठी पुन्हा एकदा लोकल सुरु व्हावी यासाठी मनसेने सोमवारी वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांमध्ये सविनय कायदेभंग आंदोलन केले. या आंदोलनात मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी काही कार्यकर्ते यांच्या साबोत लोकलने कोणत्याही परवानगी घेतल्याशिवाय प्रवास केला. त्यामुळे त्यांच्यावर कर्जत लोहमार्ग पोलिसांनी आता वेगवेगळ्या कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांमध्ये त्यांना अटक होण्याची देखील शक्यता आहे.अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सध्या सुरु करण्यात आली परंतू अजूनही सामान्य जनतेसाठी लोकल सेवा सुरू झाली नाही. एकीकडे राज्य सरकारने एसटी बसेस आणि इतर बसेस सुरु केल्या आहेत ज्यामध्ये प्रचंड गर्दी होत आहे. मग लोकल का सुरु करत नाही? असा सरकारला प्रश्न विचारत मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी काही दिवसांपूर्वीच सरकारला लोकल सुरु करण्यासाठी मुदत दिली होती. ती मुदत रविवारी संपल्याने, सोमवारी सविनय कायदेभंग करुन लोकल प्रवास करणार असे त्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार काल सकाळी संदीप देशपांडे यांच्यासह नवी मुंबई मनसे अध्यक्ष गजानन काळे आणि इतर दोघांनी शेळू ते नेरुळ असा लोकलने प्रवास केला. त्यानंतर या प्रवासाचे व्हिडीओदेखील प्रसारित केले आणि सरकारला परवानगीशिवाय लोकलमधून प्रवास करुन दाखवले.या त्यांच्या बेकायदेशीर प्रवासासाठी कर्जत लोहमार्ग पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि इतर तीन जणांच्या विरोधात वेगवेगळ्या कलमांच्या खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारने कोरोना संसर्ग संदर्भात दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याने, स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात टाकल्याने, रेल्वेमध्ये दरवाजात लटकून प्रवास केल्याने, बेकायदेशीररित्या विनातिकीट प्रवास केल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात संदीप देशपांडे यांना होऊ शकते अटक.

Related Posts
1 of 2,525
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: