या निर्णयामुळे पुणे  महानगरपालिका ठरली राज्याची सर्वात मोठी महानगरपालिका  

0 27

पुणे –  पुणे शहराच्या हद्दीलगत असलेली २३ गावं पुणे महापालिकेत समाविष्ट करण्याबाबतची अधिसूचना राज्यसरकारने  प्रसिद्ध केली आहे. या निर्णयामुळे आता पुणे महापालिका ही राज्यातील सर्वात मोठी महापालिका झाली आहे.

भाजपाचे संकटमोचक गिरीश महाजन अण्णांच्या भेटीला 

पुणे शहराच्या हद्दीलगतची ३४ गावं महापालिकेत समाविष्ट करून घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्या निर्णयाला प्रतिसाथ देत २०१७ मध्ये  ११ गावं तर उर्वरित २३ गावं पुढील तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने घेण्याचे प्रतिज्ञापत्र सादर सरकारने केले होते. त्यानुसार  २३ गावांची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
Related Posts
1 of 1,290
आता याबद्दल कोणत्याही व्यक्तीला हरकती किंवा सूचना असल्यास विभागीय आयुक्तांकडे अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत दाखल करण्याचा कालावधी असणार आहे. आता २३ गावे महापालिकेत समाविष्ट होणार असल्याने राज्यातील सर्वाधिक मोठ्या क्षेत्रफळाची महापालिका  पुणे महानगरपालिका ठरली आहे आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: