‘या’ नऊ नेत्यांची केली भाजपने हकालपट्टी !

0 43

बिहार विधानसभा निवडणूकच्या तारखा जाहीर झाल्यापासून देशभरात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. या निवडणुकांचा ऑनलाईन प्रचार सुरू झाला झाला आहे . राजकीय वर्तुळात सर्वच पक्षांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. अशातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे .भाजपने चक्क ९ नेत्यांची आपल्या पक्षातून हकालपट्टी केली आहे.

माहितीनुसार उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आल्यानंतर बंडखोरी उफाळून आली आणि नऊ नेत्यांनी एनडीएच्या उमेदवारांविरोधातच दंड थोपटल्यानं त्या ९ नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.एनडीएतील जागावाटपात नेते नाराज झाले आहेत अशी माहिती आहे .

Related Posts
1 of 253

नाराज नेत्यांनी एनडीए उमेदवारांविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पक्षविरोधी काम ने भाजपने त्या नऊ बंडखोर नेत्यांवर कारवाई केली आहे. त्या नऊ नेत्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. राजेंद्र सिंग, रामेश्वर चौरसिया, उषा विद्यार्थी, रवींद्र यादव, श्वेता सिंग, इंदू कश्यप, अनिल कुमार, मृणाल शेखर, अजय प्रताप अशी निलंबित केलेल्या उमेदवारांची नावे आहेत .

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: