या देशात कोरोनाच्या नवीन प्रकारामुळे करण्यात आली परत एखदा लॉकडाउनची घोषणा

0 24

लंडन –  संपूर्ण जगात कोरोनाने आपला प्रभाव सोडला असता ब्रिटनने या कोरोनाचा प्रभाव जगातून कमी करण्यासाठी जगात सर्वात आदी कोरोनापासून वाचण्यासाठी लसीकरण सुरू केले होते. तेव्हा आता कोरोना लवकारच जगातून कमी असा विश्वास  व्यक्त केला जात होता.  मात्र ब्रिटन मध्ये अचानक कोरोनाचा नवीन प्रकार समोर आल्याने ब्रिटनमध्ये चिंता वाढली आहे.

                   शिवसेनेचा भगवा आता हिरवा झाला आहे का – किरीट सोमय्या

ब्रिटनमध्ये खबरदारी घेत  पंतप्रधान बेरिस जॉन्सन यांनी परत एखदा लॉकडाउन लागू करण्याची घोषणा केली  आहे.  हा लॉकडाउन फेब्रुवारीच्या मध्यात होण्याची शक्यता आहे. करोनाच्या नव्या प्रकाराला रोखण्यासाठी हा लॉकडाउन लागू केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं असून याची सुरुवात शाळांपासून होणार आहे. बुधवारपासून सर्व शाळा बंद होतील अशी माहिती त्यांनी जनतेला संबोधित करताना दिली. स्कॉटलंडकडून करण्यात आलेल्या घोषणेनंतर बेरिस जॉन्सन यांनी ही घोषणा केली.

Related Posts
1 of 1,290

 हे पण पहा – रेखा जरे हत्याकांड प्रकरण । बाळ बोठेच्या स्टँडिंग अर्जावर बुधवारी होणार निर्णय

बेरिस जॉन्सन यांनी दिलेल्या माहितीनुसार, करोनाची लागण झालेले जवळपास २७ हजार लोक रुग्णालयात दाखल असून एप्रिलच्या पहिल्या महिन्यात करोनाची पहिली लाट आली होती त्याच्या तुलनेत ४० टक्के जास्त आहे. देशात अद्यापही अनेक ठिकाणी कडक निर्बंध असताना करोनाचा नवा प्रकार नियंत्रणात आणण्यासाठी आपण एकत्रितपणे अजून प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे देशात लॉकडाउन केला पाहिजे  असं बेरिस जॉन्सन यांनी सांगितलं.

राज्यात आठ जणांना नवीन कोरोनाची लागण – आरोग्यमंत्री राजेश टोपे

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: