‘या’ ठिकाणी शेतात कोसळले विमान : पायलटचा जागीच मृत्यू !

उत्तर प्रदेशमधील निजामाबाद येथे एक दुःखद घटना घडली आहे . इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण अकॅडमीचे विमान एका शेतात कोसळले आहे .शिकावू पायलट कोणार्क सरन हे विमान उडवत होते .या दुर्घटनेत पायलटचा जागीच मृत्यू झाला आहे.सकाळी 11 वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अंदाजानुसार हवामान खराब असल्यामुळे विमानावरील नियंत्रण सुटले आणि अपघात घडला..
अपघात घडताच मोठा आवाज झाला, त्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.या दुर्घटनेत विमानाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला .सुदैवाने विमानामध्ये पायलट सोडून कोणीच नव्हते.या विमानावर वीज कोसळली असावी असा अंदाजदेखील वर्तविला जात आहे.
अपघातग्रस्त विमान छोटे होते . फोटो पाहून तुम्हाला अंदाज येईल की हा अपघात किती भयानक होता.