‘या’ ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा : हवामान खात्याचा अंदाज !

मागील वर्षी प्रमाणेच राज्यात यावर्षीदेखील अति पाऊस झाला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात काही ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे आणि वाऱ्याचा जोर वाढला आहे.याचा परिणाम म्हणून सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्य़ात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.तसेच कोल्हापूर, सातारा आणि विदर्भात देखील पावसाचा जोर पाहायला मिळेल.
सध्या राज्यात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.दरम्यान, बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि त्याचा अक्ष हिमाचलच्या पायथ्याशी आहे. त्यामुळे ओडिशा आणि उत्तर भारतातही जोरदार पावसाची शक्यता आहे.या क्षेत्रामुळे पश्चिम किनारपट्टीवर द्रोणीय स्थिती निर्माण झाले आहे याचा परिणाम म्हणून कोकण किनारपट्टीवर देखील जोरदार पाऊस पडेल.
तसेच हवामान खात्याच्या अंदाजानुसार ,कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद, ठाणे, मुंबईत आणि राज्यातील अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.