या’ चुकीमुळे ‘गोपी बहु’चे करिअर झाले उध्वस्त !

एक काळ असा होता जेव्हा ‘साथ निभाना साथिया’ ही मालिका प्रकाशझोतात होती. या मालिकेमधून गोपी बहू म्हणजेच अभिनेत्री जिया मानेक फेमस झाली. साधी -सुधी सासूचं ऐकणाऱ्या गोपी बहुने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. एवढी फेमस असणाऱ्या जियाच्या मात्र एका चुकीच्या निर्णयामुळे तीच करिअर बर्बाद झालं.जाणून घेऊया नक्की जिया कुठे चुकली ज्याने तिचे करियर बरबाद झाले.
जियाने २०१२ मध्ये कलर्स वाहिनीवरील ‘झलक दिखला जा’ या डान्स शोमध्ये भाग घेतला होता . जेव्हा साथ निभाना साथियाच्या निर्मात्यांना ही गोष्ट समजली की जिया कलर्स वाहिनीच्या शोमध्ये भाग घेत आहे, तेव्हा त्यांनी जियाला मालिकेतून काढून टाकले . ज्या मालिकेने प्रसिद्धी , पैसे ,हलवून दिले ती मालिका जियाच्या हातून गेली होती.
जियाच्या जागी गोपी बहुच्या म्हणून देवोलिना भट्टाचार्यची निवड झाली. साथ निभाना साथियाच्या मालिकेतून काढल्या नंतर जियाच करिअर जणू उध्वस्थ झाले. ती ‘झलक दिखला जा’ हा शोसुद्धा जिंकू शकली नाही . आता जिया हिंदी बिग बॉस १४ च्या सीजन मध्ये दिसणार आहे.