
संसदेच्या अधिवेशनात काही खासदारांनी गोंधळ घातला तसेच तोडफोडदेखील केली . याच्यावर कारवाई करत व्यंकटेश नायडू यांनी त्या खासदारांना एका आठवड्यासाठी संसदेच्या कामकाजातून निलंबित केले. मात्र केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी पंतप्रधान नरेंद मोदींना पात्र लिहून या खासदारांना केवळ आठवड्यासाठी नाही तर वर्षभरासाठी निलंबित केले पाहिजे अशी मागणी केली आहे .
तसेच आठवलेंनी मागणी केली आहे की ,इथून पुढे ते तसेच वागले तर त्यांना उर्वरीत कार्यकाळासाठी निलंबित केले पाहिजे आणि असा कायदा संसदेत तयार व्हायला हवा.भविष्यात अशा घटना थांबवण्यासाठी संसदेत एक विधेयक असायला पाहिजे असं ट्विट त्यांनी केले आहे .
दुसरीकडे राज्यसभेत गोंधळ घातल्याने आठ खासदारांवर निलंबनाची कारवाई केल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. जोपर्यंत निलंबन मागे घेतलं जात नाही तोपर्यंत राज्यसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे .