DNA मराठी

या कारणा वरून परत राहुल गांधींचा मोदी सरकार वर हल्ला 

0 180

नवी दिल्ली –  देशात कोरोना संसर्ग वाढत असताना पंतप्रधान मोदी मोरासोबत व्यस्त आहेत  यामुळे देशातील नागरिकांनी आपला जीव स्वतः वाचवावा, असं राहुल गांधींनी ट्वीट करत परत एकदा केंद्र सरकार वर टीका केली आहे .  

Related Posts
1 of 2,489

ते म्हणाले भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या या आठवड्यात 50 लाखांपेक्षा अधिक झाली आहे. आक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील १० लाखांचा आकडा पार करेल. कोणतंही नियोजन न करता केलेला लॉकडाऊन एका व्यक्तीच्या अहंकाराचा परिणाम आहे. त्यामुळे संपूर्ण देशात कोरोनाचा संसर्ग झाला. मोदी सरकार ‘आत्मनिर्भर बनो’ असं म्हणत आहे.या ‘आत्मनिर्भर’ होण्याचा अर्थ आपला जीव आपणच वाचवा असा आहे. कारण पंतप्रधान मोदी मोरांसोबत व्यस्त आहेत.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: