या कारणा मुळे आयपीएल नाही खेळणार सुरेश रैना

नवी दिल्ली: चेन्नई सुपर किंग्ज (chennai shuper king) संघाचा स्टार खेळाडू आणि उपकर्णधार सुरेश रैना (मिस्टर आयपीएल) ने अचानक स्पर्धा सोडून भारतात परतण्याचा निर्णय घेतला होता. या साठी रैनाने वैयक्तीक कारण पुढे केले होते. नंतर संघातील १३ जणांना करोना झाला(एक खेळाळू आणि १२ स्टाफ मेंबर) आणि त्याच बरोबर हॉटल रूमवरून झालेल्या वादामुळे तो भारतात परतल्याच्या चर्चा खूब होत होती.त्यातच चेन्नईचे मालक आणि बीसीसीआयचे माजीअध्यक्ष एन. श्रीवासन याने केलेल्या वक्तव नंतर रैना बद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या.
या सर्व घटनेवर त्याने आता स्पष्टीकरण दिली आहे कि,मी पत्नी आणि मुलांच्या काळजी साठी भारतात आलो आहे. इतकच नव्हे तर मी अजून देखील आयपीएलच्या १३व्या हंगामासाठी खेळू शकतो, असे रैनाने आज स्पष्ट केले.भारतात परतण्याचा माझा वैयक्तीक निर्णय आहे . मी माझ्या कुटुंबियांसाठी परत आलो आहे. अशा काही गोष्टी होत्या ज्यामुळे मला कुटुंबासोबत राहणे अतंत्य गरजेचे होते. सीएसके देखील माझे कुटुंब आहे आणि माही माझ्यासाठी सर्व काही आहे. असा निर्णय घेणे माझ्यासाठी खूप कठीण होता.पण तो मला घ्यावा लागला.
माझ्यात आणि सीएसकेमध्ये कोणताही वाद नाही. कोणत्याही ठोस कारणांशिवाय मी साडे बारा कोटी रुपये सोडणार नाही.
मी सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी अजून युवा आहे आणि कमीत-कमी ४ ते ५ वर्ष आयपीएल खेळू शकतो, असे रैनाने सांगितले. रैनाच्या अचानक भारतात येण्यावरून श्रीनिवासन ने खूप काही बोलले होते. त्यावर विचारले असता तो म्हणाला, ते माझ्यासाठी वडीलांसारखे आहेत. नेहमी माझ्या पाठिशी उभे राहतात. मला छोट्या मुलासारखी वागणूक ते देतात. एक बाप आपल्या मुलाला ओरडू शकतो. त्यांना माहिती नव्हते की मी आयपीएल सोडून भारतात का आलो. आता त्यांना कारण कळाले आहे आणि आमचे बोलणे देखील झाले आहे. भारतात परतल्यानंतर मी क्वारंटाइन होऊन देखील ट्रेनिंग करत आहे. तुम्हाल कल्पना नाही की, मी पुन्हा आयपीएलच्या सराव सत्रात दिसू शकेन.
माझे कुटुंब आहे आणि त्याबाबत मला काळजी आहे. मला काही झाले तर त्यांचे काय होणार? माझे कुटुंब माझ्यासाठी सर्व काही आहे. सध्या मी त्यांच्यासाठी काळजीत आहे. मी भारतात आल्यानंतर मुलांना पाहिले नाही. बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापन सर्वांची काळजी घेत असल्याचे त्याने स्पष्ट सांगितले.