भारतात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले असून दर दिवशी ९० हजारांहून जास्त रुग्ण सापडत आहेत .कोरोनारुग्णवाढीच्या संख्येत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे.सुरुवातीच्या काळात रुग्णसंख्या आटोक्यात होती ,मात्र आता खूप वेगाने याचा प्रसार होताना दिसत आहे. भारतात इतक्या वेगाने कोरोना का पसरत आहे याचे कारण आता समोर आले आहे. जाणून घेऊया नक्की काय कारण आहे भारतात कोरोनाचा उद्रेक होण्याचे …
यामागील एक धक्कादायक कारण समोर आलं आहे.हैदराबादच्या सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायॉलॉजीच्या संशोधनात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे . भारतात कोरोनाच्या A2a या स्ट्रेनने मोठ्या प्रमाणात हात पाय पसरले आहेत .जगभरात देखील A2a याच स्ट्रेनमुळे मोठ्या प्रमाणात कोरोनाचे संक्रमित होत आहे.
भारतात तर एकूण कोरोना रुग्णांच्या 70 टक्के रुग्ण हे A2a स्ट्रेनमुळे संक्रमित झाले आहेत.सध्या जगभरात प्रकारच्या कोरोना व्हायरसवर लस तयार करण्याचे काम सुरु आहे.चिंतेची बाब म्हणजे भारतात सध्या लसींची चाचणी A3i या व्हायरसवर उपयोगी आहे .आता ही लस A2a स्ट्रेन व्हायरस वर सुरभी ठरणार की नाही यावर चिंता वाढली आहे.