या कारणाने सना खान ने सोडले बॉलिवूड…

0 39

मुंबई- जय हो या चित्रपटात सलमान खानसोबत काम केलेली आणि ‘बिग बॉस’मध्ये सहभागी झालेली अभिनेत्री सना खान हिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर पोस्ट करुन आपण चित्रपटसृष्टी सोडत आहे अशी घोषणा केली. पोस्टमध्ये तिने इस्लामसाठी चित्रपटसृष्टी सोडत असल्याचं म्हटलं आहे.

तिच्या आधी ‘दंगल’ चित्रपटामुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री झायरा वसिम हिनेसुद्धा इस्लामसाठी बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर बराच वादसुद्धा झाला होता.
सना खानने अापल्या पोस्टमध्ये लिहिलं, ‘आज मी माझ्या आयुष्याच्या अत्यंत महत्त्वाच्या वळणावर आली आहे. मी गेल्या अनेक वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केलं आणि त्या काळात मला प्रसिद्धी, पैसा, सन्मान या सर्व गोष्टी मिळाल्या.

पण पैसा आणि प्रसिद्धीच्याच मागे धावणं हा एकमेव जगण्याचा उद्देश आहे का, असा प्रश्न मला सतावू लागला. गरजू व्यक्तींना मदत करण्याचं कर्तव्य प्रत्येकाचं नाही का? या प्रश्नांची उत्तर मी बऱ्याच काळापासून शोधत होते. जेव्हा मी माझ्या धार्मिक शिकवणीत या प्रश्नांची उत्तर शोधली, तेव्हा मला समजलं की फक्त पैसा आणि प्रसिद्धी कमावणं हाच आयुष्याचा एकमेव उद्देश नाही.

Related Posts
1 of 1,420

त्यामुळे मी आजपासून फिल्म इंडस्ट्रीला कायमचा सोडत आहे आणि यापुढे मी लोकांची, गरजूंची सेवा करेन. अशी पोस्ट त्यानी लिहली आहे.
कोण आहे सना खान-
सना खानने ‘बिग बॉस’च्या सहाव्या सिझनमध्ये भाग घेतला होता. तसेच त्यांनी सलमान खान बरोबर जय हो हे चित्रपट केला आहे तसेच हेट स्टोरी ३ या चित्रपटानंतर ते चर्चेत आली होती.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: