या कारणाने बीसीसीआयने अजित आगरकरचा केला पत्ता कट  

0 27

नवी मुंबई –  भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने काल  गुरुवारी तीन नव्या  राष्ट्रीय निवडकर्त्यांची घोषणा केली आहे . भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने चेतन शर्मा यांची मुख्य निवडकर्ता म्हणून निवड केली आहे. तर देवाशिष मोहंती आणि अभय कुरुविला यांची  निवड समीतीत निवडकर्तापदी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र मुख्य निवडकर्ता भारताचे माजी  क्रिकेटपटू अजित आगरकरची निवड जवळपास निश्चित मानली जात होती . मिळालेल्या माहिती नुसार अजित आगरकर मुंबई क्रिकेटचा समर्थन प्राप्त करू शकले नाही याच मुख्य कारणाने त्यांच्या जागी चेतन शर्माला पसंती देण्यात आली आहे अशी माहिती प्राप्त झाली आहे.

हे पण पाहा- बोठेच्या संपर्कातील त्या व्यक्तींची झाली सखोल चौकशी

Related Posts
1 of 47

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर,करण्यात आले चार बद्दल 

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने  सांगितले की, “आगरकर मुंबई क्रिकेट संघाचे समर्थन प्राप्त करू शकले नाहीत. त्यांनी मुंबई संघाचे मुख्य निवडकर्ता म्हणून जास्त सामने पाहिलेले नाहीत, असा त्यांच्यावर आरोप होता. मुंबई क्रिकेट जगतातील प्रभावशाली व्यक्तींचे कुरुविला यांना समर्थन होते. त्यामुळे उत्तम क्रिकेट आकडेवारी असूनदेखील आगरकर कुरुविलावर मात करू शकले नाहीत.” अजित अगरकरने भारताकडून २६ कसोटी आणि  १९१ एकदिवसीय सामने खेळले आहेत.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: