DNA मराठी

यामुळे शरद पवार करणार अन्नत्याग

0 199

मुंबई- कृषी विधेयक प्रकरणी राज्यसभा खासदारांच्या पाठिंब्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अन्न त्याग करणार आहेत.शरद पवार यांनी आपल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. ‘खासदारांच्या निलंबनाचा निर्णय अयोग्य आहे. केवळ भूमिका मांडण्यासाठी खासदारांचे निलंबन करण्यात आले. अशा पद्धतीने खासदारांचा मूलभूत अधिकार हिरावणे अयोग्य आहे. त्यामुळे, सदस्यांच्या आंदोलनात सहभागी होऊन मी देखील अन्नत्याग करणार’, असे शरद पवारांनी जाहीर केले आहे.

Related Posts
1 of 2,489

मोदी सरकारच्या वादग्रस्त कृषी विधेयकाविरोधात रविवारी (२० सप्टेंबर) राज्यसभेत अभूतपूर्व गदारोळ झाला. मात्र, सदस्यांच्या चर्चेच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आवाजी मतदानाने हे विधेयक सभागृहात घाईघाईने मंजूर करून घेण्यात आले.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: