DNA मराठी

यंदा गणराय सुद्धा लाईव्ह ; गणेशोत्सव आणि मोहोरम आगमन विसर्जन मिरवणुकीवर बंदी

0 82
Related Posts
1 of 2,452

अहमदनगर : गणेशोत्सवाची सगळेच आतुरतेने वाट पाहत असतात वेगळीच वातावरण निर्मिती झालेली असते . परंतु ,कोरोना संकटामुळे सगळंच विस्कळीत झालय . त्याचा परिणाम गणेशोत्सव आणि मोहोराम वाराही होतोय कारण यंदा गणेशोत्सव आणि मोहोराम एकत्रच येतायेत . जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणि पोलीस अधिक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या आदेशानुसार गणेशोत्सवामध्ये सार्वजनिक ठिकाणी गणरायाची स्थापना परवानगीशिवाय करता येणार नाही तसेच मंडप उभारण्यास परवानगी नाही , दोन्ही भरतीवेळी फक्त ५ भक्तांनाच परमिशन असून लाईव्ह दर्शन राहील . विसर्जनावेळी मनपा तर्फे एका वाहनाची व्यवस्था केली जाईल आणि एकाच तलावात विसर्जन होईल , गणेशमूर्ती ४ फुटापर्यंतच असावी त्याचबरोबर घरगुती २ फूट . मोहोरम मध्ये सार्वजनिक ठिकाणी सवार्यांची स्थापना करता येणार नाही तसेच कत्तल कि रातही होणार नाही नागरिकांनी सावरल्या घरातच स्थापन कराव्या . नवसाच्या सवाऱ्या दर्शनासाठी नेता येतील पण गर्दी  होणार नाही याची खबरदारीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत . 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: