DNA मराठी

म्हणून मुलाने केला बापाचा खून……

0 192

अमरावती – जिल्ह्यातील दत्तापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत परसोडी इथं आज सकाळी मुलाने आपल्या ६३ वर्षीय वडिलांच्या डोक्यात वरवंटा घालून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान, यावेळी आरोपी मुलगा हा मनोरुग्ण असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.धम्मदीप काळे असे आरोपी मुलाचे नाव असून त्याने आपले वडील रामकृष्ण काळे यांच्यासोबत सकाळी घरीच वाद घातला. नंतर हा वाद इतक्या टोकाला गेला की त्याने आपल्या जन्मदात्या वडिलांच्या डोक्यात दोन वेळा दगडी वरवंटा घातला.शुल्लक कारणावरून झालेल्या या वादाचा शेवट खुनापर्यंत झाल्याने सगळं शहर हादरलं आहे.

Related Posts
1 of 2,492

धम्मदिप विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी घटनास्थऴावरून वडिलांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.डोक्यात गंभीर जखमा झाल्यामुळे वडिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: