म्हणून मराठा समाजाचा पोलिस भरतीला विरोध

मुंबई- राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोलीस भरती करण्यास मान्यता देण्यात आली. त्यात मराठा समाजासाठी १३ टक्के जागा राखीव ठेवण्याची ग्वाहीअनिल देशमुख यांनी काल दिली होती, परंतु मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणातील आरक्षणाला हा सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिल्याने कोणती भरती प्रक्रिया लागू नये अशी मागणी सर्व मराठा संघटनांनी केली आहे .
राज्य शासनाने जाहीर केलेल्या पोलीस भरतीचा विरोध करत मुंबईसह महानगरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काही मराठी संघटनांनी आणि आंदोलनांनी आंदोलकांनी दिला आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात कोणतीही सरकारी नोकर भरती करू घेऊ नये अशी मागणी खासदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे.
आंदोलना पूर्वी सरकारने नोटिसा बजावल्याने गनिमी काव्याने आंदोलन करू असे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.दरम्यान काल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस भरती मध्ये १३ टक्के राखीव जागा मराठा समाजाला ठेवण्याचा एका ट्विट मधून जाहीर केला होता. ही भरती तब्बल १२ हजार ५०० रिक्त पदांसाठी होणार आहे.