मोक्काचे गुन्ह्यामध्ये मागील दीडवर्षापासून फरार असलेला आरोपी जेरबंद

0 23
अहमदनगर –  स्वस्तात सोने देण्याचे अमिष दाखवून दिनेश दगडू पाटील यांना कोपरगाव येथे बोलावून घेवून मारहाण करुन त्याच्या जवळील रोख रक्कम, मोबाईल आणि सोन्याच्या अंगट्या असा एकूण १०,७४,०००/-रु. किं.चा ऐवज दरोडा टाकणाऱ्या आणि मोक्काचे गुन्ह्यामध्ये मागील दीड वर्षापासून फरार असलेला आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केला आहे.
 या बाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी कि  दिनांक ०७ जुलै २०१९ रोजी फिर्यादी श्री. दिनेश दगडू पाटील, रा. सुमतीवसंत अपार्टमेंट, पाटील लेन, नाशिक यांना आरोपी नामे भगीरथ भोसले, हिरु भोसले, दोघे रा. पढेगांव, ता- कोपरगाव यांनी व त्यांचे साथीदारांनी मिळून १०,००,०००/-रु. किं.स एक किलो सोने स्वस्तात विकत देण्याचे अमिष दाखवून फिर्यादी यांना सावळगाव शिवार, ता. कोपरगाव येथे बोलावून घेवून मारहाण करुन फिर्यादी जवळील रोख रक्कम, मोबाईल व सोन्याच्या अंगट्या असा एकूण १०,७४,०००/-रु. किं.चा ऐवज दरोडा टाकून चोरुन नेला होता. सदर घटनेबाबत फिर्यादी यांनी कोपरगाव तालूका पो.स्टे. येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं । १०४/२०१९, भादवि कलम ३९५, ४२० प्रमाणे दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्यातील आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याने व वेळोवेळी संघटीतपणे गुन्हे करीत असल्याने सदर गुन्ह्यास महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अधि. कलम ३ (१) (II), ३, (३) व ३ (४) ही कलमे लावण्यात आलेली होती.
Related Posts
1 of 1,290
सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर गुन्ह्यातील आरोपी हे नजरेआड झालेले होते. सदर गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेणेकामी मा. पोलीस अधीक्षक साो, अहमदनगर यांचे आदेशाने पोनि/श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी स्वतंत्र पथक नेमले होते. त्याप्रमाणे पथकातील अधिकारी व कर्मचारी गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेत असताना पोनि/श्री. अनिल कटके यांना गोपनिय माहीती मिळाली कि, सदर गुन्ह्यातील फरार आरोपी पांड्या उर्फ पांडूरंग भोसले, रा. पढेगांव, ता. कोपरगांव हा त्याचे घरी पढेगांव येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकातील सफौ/मोहन गाजरे, पोहेकॉ/बाळासाहेब मुळीक, पोना/शंकर चौधरी, सचिन आडबल, विशाल दळवी, दिपक शिंदे, राहुल सोळंके, रणजीत जाधव, रोहीत यमुल, चापोना/चंद्रकांत कुसळकर अशांनी मिळून पढेगांव येथे जावून आरोपीचे वास्तव्याबाबत गोपनिय माहिती घेवून मिळालेल्या माहितीचे आधारे सापळा लावून आरोपी नामे पांडया उर्फ पांडुरंग भारम भोसले, वय- २६ वर्षे, रा. पढेगाव, ४५ चारी, ता- कोपरगाव यांस ताब्यात घेवून कोपरगांव तालूका पो.स्टे. येथे हजर केले आहे. पुढील कार्यवाही कोपरगांव तालूका पो.स्टे. हे करीत आहेत .
                                                              रेशनकार्डसाठी अतिरीक्त रक्कम घेणाऱ्यांवर कारवाई इशारा
वरील नमुद आरोपी पांडया उर्फ पांडुरंग भारम भोसले याचे विरुध्द खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
१) कोपरगांव तालूका पो.स्टे. गुरनं. 1 ४५/२०२०, भादवि कलम ३२६,१४३, १४७, १४८, १४९ (फरार)
२) कोपरगाव पो.स्टे. गुरनं. 1३४७/२०१४, भादवि कलम ३९५,४२०,३४
सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील साो. पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्रीमती. दिपाली काळे मॅडम, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व मा. श्री. संजय सातव साो. उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: