मृत्युदर एक टक्यांवर आणणार; राजेश टोपे !

0 19

देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे .कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाच्या संख्येने एका लाखांचा टप्पा पार केला आहे. जरी कोरोनामुळे देश चिंतेत असला तरी एका दिलासादायक बातमी आहे.दिवसेंदिवस करोना रुग्णांची संख्या कमी होत असून, बरे होणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, जास्तीत जास्त रुग्ण बरे कसे होतील यासाठी वेगवेगळ्या उपाय योजना केल्या जात आहेत .आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली की, करोनामुळे होणारा मृत्युदर एक टक्क्यावर आणण्याचे उद्दिष्ट आहे .यासाठी टेलीआयसीयूचा राज्यभरात विस्तार करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सकारात्मक भूमिकेत आहेत .

Related Posts
1 of 1,375

कोरोनाला हरवण्यासाठी आणि आरोग्य सुविधेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज आहे. तसेच राज्यात विशेषज्ञांची जाणवणारी कमतरता टेलीआयसीयू तंत्रज्ञानामुळे काहीशी भरून निघेल असा विश्वास राजेश टोपेंनी व्यक्त केला.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: