मृतदेहांच्या अंत्यविधीचा मार्ग मोकळा


अहमदनगर : कोरोनामुळे अनेक रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत आणि त्यांच्या मृतदेहांची अंत्यविधी पर्यंत हेळसांड होते त्याचबरोबर अंत्यविधीच्या मार्गात खूप अडथळे येत आहेत . परंतु महापालिकेने हे काम आता मुलतानचंद बोरा ट्रस्टकडे हस्तांतरित केले असून नवीन शववाहिनी उपलब्ध करून दिलीये , त्यामुळे अंत्यविधीचा मार्ग सुकर झालाय . अंत्यविधीसाठी तासंतास प्रतीक्षा करावी लागायची , सुसूत्रता नव्हती म्हणूनच जुन्या ठेकेदाराकडून मृतदेह वाहतुकीचे काम काढून घेऊन मुलतानचंद बोरा ट्रस्टकडे देण्यात आले . अमरधाम मध्ये दुसरी विद्युत दाहिनी कार्यान्वयीत करण्याचे कामही युद्ध पातळीवर सुरु आहे ,