मुलांना वेळ देणे शक्य नसलेल्या पालकांनी ‘हे’ कराच

0 28

आजकल रोजच्या धकाधकीच्या जीवनात सर्वच जण शर्यतीत धावत असतात. या स्पर्धेच्या युगात त्यांना स्वत:साठीही वेळ देणं कठीण झाले आहे. त्यातच लहान मुले असतील आणि आई-वडील दोघेही नोकरीला जाणारे असतील तर मुलांसाठी वेळ काढणं मुश्किल होतंय. प्रत्येक पालकांना आपल्या मुलांसह क्वालिटी टाईम व्यतीत करायचा असतो. परंतु, नोकरी आणि घर अशा दोन्ही गोष्टी सांभाळताना अनेकांना तारेवरची कसरत करावी लागते. परंतु या सगळ्यामधून वेळ काढून काही सोप्या पद्धतीने तुम्ही मुलांना वेळ नक्की देऊ शकता.

मोबाईलपासून दूर राहा-
घरी असताना पालकांनी मोबाईल, लॅपटॉप यांसारख्या गोष्टी बाजूला सारून तो वेळ आपल्या मुलांसह व्यतीत करा. त्यामुळे मुलं दिवसभरातील त्यांनी केलेल्या गोष्टी तुम्हाला सांगू शकतील.

जामखेड तालुक्यातील खूरदैठण ग्रामपंचायतीची निवडणुक बिनविरोध

शॉपिंगसाठी शक्यतो बाहेर पडू नका
जर तुम्ही घरी असाल तर शॉपिंगसाठी शक्यतो घराबाहेर पडू नका. अतिशय गरज असेल तिथेच बाहेर पडा. शॉपिंगच्या वेळेत तुमच्या लहान मुलांसोबत खेळा त्यांच्याशी गप्पा मारा.

Related Posts
1 of 44

 रेखा जरे हत्या प्रकरण – बाळ बोठेच्या स्टॅंडिंग वॉरंट अर्जावर आज सुनावणी  

नियमित व्यायाम करा
जर तुम्ही नियमित व्यायाम करत असाल तर तुमच्यासोबत तुमच्या मुलांनाही त्यात सामिल करा. त्यांनाही तुमच्यासोबत मॉर्निग वॉकसाठी बाहेर घेऊन जा. त्यामुळे त्यांनाही चांगल्या सवयी लागून आरोग्यही उत्तम राखण्यास मदत होईल. त्यासोबतच तुम्ही एकमेकांसोबत अधिक वेळ घालवू शकाल.

अक्षय कुमारने केली घोषणा भारतात या दिवशी लॉन्च होणार बहुचर्चित फौजी गेम 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: