मुलांची अतिप्रमाणात गोड खाण्याची सवय सोडवण्यासाठी वापरा मीरा राजपूतच्या ‘या’ खास टिप्स!

0 30

हे सांगायची गरज नाही की लहान मुलांना गोड किती आवडतं. लाखो प्रयत्न केल्यानंतर देखील मुलांना गोड खाण्यापासून परावृत्त करता येत नाही. पण त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मुलांना गोड पदार्थांपासून दूर ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. पण हा कठीण टास्क कसा पूर्ण करावा या विचारात असाल तर मीरा राजपूतच्या टिप्स येतील तुमच्या कामी.

लहान मुले म्हटली की ती गोड खाणारच! गोष्ट कोणतीही असो ती एका मर्यादित प्रमाणात वापरली किंवा त्याचे सेवन केले तर ते चांगले असते पण जेव्हा प्रमाण मर्यादेबाहेर जाते तेव्हा समस्या सुरु होतात आणि म्हणून लहान मुले कमी प्रमाणात गोड खात असतील तर हरकत नाही, पण हि त्यांची सवय होऊ देऊ नका. पालक म्हणून त्यांच्यावर लक्ष ठेवा. हीच गोष्ट शाहीद कपूरची (shahid kapoor) पत्नी मीरा राजपूत कपूर (meera rajput kapoor) देखील करते. तिने सुद्धा आपल्या मुलांच्या गोड खाण्यावर निर्बंध लादून ठेवले आहेत.

हे केवळ त्यांच्या काळजीपोटी नाही तर त्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी आहे. जास्त प्रमाणात गोड खाल्ल्याने लहान वयापासूनच अनेक समस्या मुलांना त्रास देण्यास सुरुवात करू शकतात. अनेक आजार असेही आहेत जे लहान पाणी हळूहळू आकार घेऊ लागतात आणी मोठे झाल्यावर अचानक गंभीर समस्या म्हणून पुढे येतात. त्यामुळे प्रत्येक पालकाने आपल्या मुलाच्या गोड खाण्यापिण्याच्या सवयीवर लक्ष ठेवायला हवे. आज आपण मीरा राजपूत वापरत असलेल्या काही टिप्स जाणून घेऊया. (how to break a child’s habit of eating sweets)

Related Posts
1 of 104

मीरा म्हणते की सुदृढ आरोग्यासाठी काय काय करावे त्याची शिकवण मला माझी आईकडून मिळाली आणि तोच वारसा मी पुढे माझ्या मुलांना देण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेले असे अनेक पदार्थ आहे जे आपण लहान मुलांना बालपणी द्यायला हवेत. यामुळे मोठे झाल्यावर त्यांनाच फायदा होतो. मुलांना सतत गोड धोड खायला देण्यापेक्षा आवळ्याचा ज्यूस, हळदीचे दूध असे पदार्थ दरोरोज द्यायला हवेत असे मीरा राजपूत ठामपणे सांगते आणि ती देखील आपल्या मुलांना आवर्जून चांगल्यातले चांगले पदार्थ देण्याचा प्रयत्न करते. ज्यांचे सेवन करून मुलांचे शरीर सुदृढ होईल.

मीरा आपल्या मुलांना अजिबातच गोड खाऊ देत नाही से नाही. पण तिने एक ठराविक प्रमाण नेमून दिले आहे आणि महिन्यातून ठराविक वेळीच ती त्यांना गोड खाण्याची परवानगी देते. बरं फक्त ती सांगत नाही तर अतिशय काटेकोरपणे पाळते सुद्धा, यातून तिच्यामधील एक सतर्क आई आपल्याला दिसते. अनेकदा गोड धोड मुलांना द्यायचे झालेच तर ती स्वत:च्या हाताने बनवून त्यांना खाऊ घालते. बाजारात उपलब्ध असणारे पदार्थ ती शक्यतो मुलांना खायला देत नाही कारण त्या पदार्थांमुळे आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता जास्त असते असे तिचे मत आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: