मुंबई हायकोर्टच्या सोनू सुदला दणका

0 27

नवी मुंबई – बीएमसीविरुद्ध दाखल करण्यात आलेली अभिनेता सोनू सूदची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. बीएमसी आपल्या नोटिशीप्रमाणे कारवाई करू शकत असल्याचं, मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. अवैध बांधकाम कारवाई प्रकरणी रोख लावण्यासाठी अभिनेता सोनू सूदने बीएमसीविरोधात याचिका दाखल केली होती.

काय आहे प्रकरण –
जुहूच्या ज्या परिसरात सोनू सूदची ६ मजली इमारत आहे तो रहिवासी भाग आहे. अभिनेता सोनू सूदने कोणत्याही परवानगीशिवाय तिथे हॉटेल सुरू केलं आहे. तसंच या इमारतीमध्ये अवैधरित्या काही बदल केले आहेत. याबद्दल बीएमसीने सोनू सूदला गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये नोटीसही पाठवली होती आणि Maharashtra Region & Town Planning कायद्याअंतर्गत सोनू सूद विरोधात बीएमसीने जुहू पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली होती.

यानंतर अभिनेता सोनू सूदने दिवानी कोर्टात याचिका केली होती. पण तिथं न्याय न मिळाल्यानं त्यानंतर हायकोर्टात धाव घेतली होती.

Related Posts
1 of 61

आपल्या याचिकेत इमारतीमध्ये केलेले बदल कायदेशीर असल्याचं म्हटलं होतं. तसंच बीएमसीच्या परवानगीची गरज आहे, असं कोणतंही बांधकाम केलं नसल्याचं, सोनू सूदचे वकील डी.पी. सिंग यांनी याचिकेत म्हटलं होतं.

 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: