मुंबई बद्दल अभद्र भाषेचा उपयोग केला तर माफी मागावीच लागेल- संजय राऊत

मुंबई – कंगना रनौतवर पुन्हा एकदा खासदार संजय राऊत यांनी रोखठोक भूमिका घेतली आहे. कंगना विषयी आपण केलेले विधान योग्य आहे का? असा प्रश्न विचारला तेव्हा त्यानी असे उत्तर दिले कि मुंबई किंवा महाराष्ट्राबद्दल येथे राहणाऱ्या कोणत्याही मराठी माणसाबद्दल अशाप्रकारे अभद्र भाषेचा उपयोग करणाऱ्यांना महाराष्ट्राची आणि मुंबईची माफी मागावीच लागेल. ते आमच्यापैकी कुणी असेल तरीही त्याला मी माफी मागायला सांगेल.
याआधी संजय राऊत यांनी अभिनेत्री कंगना रनौतशी व्यक्तिगत भांडण नाही.हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांचा आहे हे भान ठेवून बोलणं गरजेचं आहे. कंगना रनौतशी माझं व्यक्तिगत भांडण नाही. पण महाराष्ट्राच अपमान करणारा कुणीही, कितीही मोठा असो खपवून घेणार नाही.
भाजपचे नेते आशिष शेलार यांचीही भूमिकाही मी वाचली त्यांनी हे अधिक जोराने म्हटलं पाहिजे. महाराष्ट्र त्यांचा सुद्धा आहे. ते सुद्धा महाराष्ट्रात राजकारण करतात. छत्रपती शिवाजी महाराज एका पक्षाचे, जातीचे नाहीत. ते देशाचे आणि महाराष्ट्राचे आहेत.
अशा शिवरायांच्या महाराष्ट्रावर एखादी व्यक्ती अशाप्रकारे घाणेरड्या शब्दात काही बोलत असे तर हा विषय एका पक्षाचा राहत नाही. हा विषय शिवसेनेचा नाही. हा विषय महाराष्ट्रातील ११ कोटी जनतेचा आहे. सर्व राजकीय पक्षांचा हा विषय आहे. इथं महाराष्ट्रात राहतात खातात-पितात त्या सर्वाचा विषय आहे. बॉलिवूडमधील अनेक मोठ्या कलाकारांनी या विधानाचा निषेध केलाय. मी त्यांचं अभिनंदन करतो असंही संजय राऊत म्हणाले.